चमके आकाशी तारा
चमके आकाशी तारा
चम चम चम,चमके आकाशी तारा,
चम चम चम,
चमके आकाशी तारा।
संदेशा देई खरा,
मध्य रात्रिच्य त्या सुमरा,
आज घरा घरातून पाळा,
क्रिस्त जयंती,
थाटात सोहळा।
जगी प्रतिपाल,
महा येशु बाळा,
साऱ्या जगताचा तारणारा।
चम चम चम,
चमके आकाशी तारा।
संदेशा देई खरा,
मध्य रात्रिच्य त्या सुमरा,
ग्लोरिया ग्लोरिया।
युग युगाचे अंतरात,
बीज देवाने जे पेरिले,
दिन दयेच्य उरावर,
नवेच कोंब उगवले।
अंधाराचा वाटेवर,
दिपसहस्त्र उजळले,
उजळले,
ग्लोरिया ग्लोरिया।
स्वप्न देवाचे आज हो,
साकारले साकारले,
बाळ देवाचे धरती,
उतरले उतरले।
ग्लोरिया ग्लोरिया।
दिस आहे सोनियाचा,
ख्रिस्त राज्याच्या जन्माचा,
ताल धरुनी नाचुया,
बाल येशुला भेटुया,
दिस आहे सोनियाचा,
ख्रिस्त राज्याच्या जन्माचा,
क्रिस्ता राज्याच्या जन्माचा।
Christmas Fusion 2022 | Vasaikar Marathi Christmas Songs | The Pacifiers