काकड आरती करीतो साईनाथ देवा

काकड आरती करीतो साईनाथ देवा

काकड आरती,
करीतो साईनाथ देवा,
करीतो साईनाथ देवा,
चिन्मयरुप दाखवी,
घेऊनी बालक लघुसेवा,
चिन्मयरुप दाखवी,
घेऊनी बालक लघुसेवा।

काम क्रोध मद मत्सर,
आटुनी काकडा केला,
आटुनी काकडा केला,
वैराग्याचे तूप घालुनी,
मी तो भिजवीला,
वैराग्याचे तूप घालुनी,
मी तो भिजवीला।

साईनाथ गुरुभक्तिज्वलने,
तो मी पेटविला,
ज्वलने तो मी पेटविला,
तद्वृत्ती जाळुनी गुरुने,
प्रकाश पाडिला,
गुरुने प्रकाश पाडिला,
द्वैत तमा नासूनी,
मिळवी तत्स्वरुपी जीवा,
मिळवी तत्स्वरुपी जीवा,
चिन्मयरुप दाखवी,
घेऊनी बालक लघुसेवा,
काकड आरती,
करीतो साईनाथ देवा,
करीतो साईनाथ देवा,
चिन्मयरुप दाखवी,
घेऊनी बालक लघुसेवा।

भूचरखेचर व्यापूनी,
योगी हृत्कमली राहसी,
योगी हृत्कमली राहरसी,
तोचि दत्तगुरुदेव तू,
शिर्डी राहुनी पावसी,
तोचि दत्तगुरुदेव तू,
शिर्डी राहुनी पावसी।

राहुनी येथे अन्यत्रही तू,
भक्तास्तव धावसी,
तू भक्तास्तव धावसी,
निरसुनिया संकटा दासा,
अनुभव दाविसी,
दासा अनुभव दाविसी,
न कळे त्वल्लीलाही,
कोण्या देवा वा मानवा,
कोण्या देवा वा मानवा।

चिन्मयरुप दाखवी,
घेऊनी बालक लघुसेवा,
काकड आरती,
करीतो साईनाथ देवा,
करीतो साईनाथ देवा,
चिन्मयरुप दाखवी,
घेऊनी बालक लघुसेवा,
चिन्मयरुप दाखवी,
घेऊनी बालक लघुसेवा।
 



Kakad Aarti Karito Sainath Deva | Sai Baba Popular Aarti | काकड आरती | Parshuram, Balkrishna

Next Post Previous Post