नाचत गाजत आली रजनी

नाचत गाजत आली रजनी

ग्लोरिया ग्लोरिया,
ग्लोरिया,
हर्षुनि जल्लोष करुया,
नाचत गाजत,
आली रजनी,
दिसला तारा,
एक गगनी,
पूर्वेच्‍या चांदण्‍यात,
लुक लुकला,
गायीच्या गोठ्यात,
ख्रिस्त जन्माला।

सुवार्ता गाई दूत जगी,
मेंढपाळ आली हर्षुनी,
मानवतेच्य हे सुता,
जगी आला ताराया।

गा गा गाऊया,
ना ना नाचुया,
नाचत गाजत आली रजनी,
दिसला तारा एक गगनी,
पूर्वेच्‍या चांदण्‍यात,
लुक लुकला,
गायीच्या गोठ्यात,
ख्रिस्त जन्माला।

गा मधुर स्वरात,
धरणी धरा,
जय जगधुधरा,
बाल येशु जन्म आला।

जय जय जय जयकार करा,
बाळ दर्शनासी घ्याया,
बेथलेमाशी जाउया,
गा मधुर स्वरात,
धरणी धरा,
जय जगधुधरा।

गगनी गाती गायने,
दिव्य दूत प्रेमाने,
सुंदर किती सुमने,
धरणी सजली,
शाळू ल्याली,
प्रभू पदी कशी रमली।

न्याय नीति धर्म,
जगा शिकवारे,
मानव धर्म कर्म,
रुधयी ठसवा रे।

हर्षुया गीत गाऊया,
नाच नाचुया रे,
तारक आला,
जगी आमुच्या,
चला भेटुया रे।

नाचू गाऊ हर्षु चला,
बाळ येशु जन्म आला,
त्याला  वंदू चला,
त्याचि स्तुति करुया,
दूता संगे त्यचे नाव गर्जुया।

बघा आयला,
नातलचा यो दिस,
करू साजरा त्याच्य,
जन्माचा यो दिस,
गावांचे लोक सगळे,
देवाला आले,
ऐकवला आपल्य,
सनाच ते मिस,
ग्लोरिया,
एक्सेलिस डीओ।
 


Christmas Fusion 2022 | Vasaikar Marathi Christmas Songs | The Pacifiers
Next Post Previous Post