एलोही एलोही लमा सबकतनी

एलोही एलोही लमा सबकतनी

एलोही एलोही,
लमा सबकतनी,
एलोही एलोही,
लमा सबकतनी,
एलोही एलोही,
लमा सबकतनी,
बलीदानाच्या वेदीवरूनी,
हाक मारिली कुणी।

दिनकर लपला आकाशातुनी,
काळोखाचे राज्य पसरूनी,
नि:शब्द झाली अवघी धरणी,
काय वदे वाणी,
लमा सबकतनी।

स्वर्ग धरेवर शिडी लावूनी,
क्रुस खांबशी प्रतिक समजूनी,
जा पतिता जा वरती चढूनी,
सुख लोकी जीवनी,
लमा सबकतनी।

पुत्र पित्याचे नाते विसरूनी,
ऐहिक देहे अतिस्वरांनी,
त्याजिले का मज आज या क्षणी,
निराधार भुवनी,
लमा सबकतनी।

नजर भिरेभिरे अवती भवती,
दिसे कुणी ना सखे सोबती,
या जगाताचे ते या जगती,
साथ नसे कोणी,
लमा सबकतनी।

विनवी बापा म्हणूनी तुजला,
जवळ घे तव क्षणी,
लमा सभकतनी।
 



एलोही एलोही लमा सबकतनी | Eloi Eloi Lama Sabachthani | Marathi Christian Song
Next Post Previous Post