तू बुद्धी दे तू प्रकाश दे
तू बुद्धी दे तू प्रकाश दे,
तू बुद्धी दे तू प्रकाश दे।
तू बुद्धि दे, तू प्रकाश दे,
नवचेतना विश्वास दे,
जे सत्य सुंदर सर्वथा,
आजन्म त्याचा ध्यास दे।
सापडेना वाट ज्यांना,
हो तयांचा सारथी,
हरवले आभाळ ज्यांचे,
हो तयांचा सोबती,
करिती तुझी जे साधना,
त्यांना तुझा सहवास दे।
सन्मार्ग आणि सन्मती,
लाभो सदा सत्संगती,
नीती ना ही भ्रष्ट हो,
जरी संकटे आली किती,
पंखात ह्या बळ दे नवे,
झेपावण्या आकाश दे।
Tu Budhi De Tu Prakash De | तू बुद्धी दे तू प्रकाश दे | Rev.Sanjay James Thakor
New Bhajan 2023 Lyrics in Hindi