वधस्तंभी खिळलेला लिरिक्स
वधस्तंभी खिळलेला,
वधस्तंभी खिळलेला,
तो दिनाचा मुक्तीदाता,
पाप्याचा उद्धार करण्या,
येशू माझा खांबी गेला,
वधस्तंभी खिळलेला,
तो दिनाचा मुक्तीदाता।
तो दोन चोरांच्या मधे,
व्याकुळलेला तहानलेला,
असाह्यी वेदना त्या,
मजसाठी शोषीला,
पाप्याचा उद्धार करण्या।
धगधगत्या त्या उन्हात,
येशू माझा ज्यांनी खिळीला,
कर क्षमा तु त्यांनी बापा,
हे येशू बोलला,
पाप्याचा उद्धार करण्या।
वधस्तंभी खिळलेला | Vadhastambhi Khilalela | Marathi Christian Song
Jesus Christ Praise and Worship Lyrics