या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे लिरिक्स Ya Janmavar Ya Jaganyavar Lyrics | Arun Date
या जन्मावर, या जगण्यावर,
शतदा प्रेम करावे चंचल वारा,
या जल धारा,
भिजली काळी माती,
हिरवे हिरवे प्राण तशी ही,
रुजून आली पाती,
फुले लाजरी बघून कुणाचे,
या जन्मावर, या जगण्यावर,
हळवे ओठ स्मरावे.
रंगाचा उघडूनिया पंखा,
सांज कुणी ही केली काळोखाच्या दारा वरती,
नक्षत्रांच्या वेली,
सहा ऋतूंचे सहा सोहळे,
येथे भान हरावे.
बाळाच्या चिमण्या ओठांतून,
हाक बोबडी येते,
वेली वरती प्रेम प्रियेचे,
जन्म फुलांनी घेते,
नदीच्या काठी,
साजणा साठी,
गाणे गात झुरवे.
ह्या ओठांनी चुंबन घेईन,
हजारदा ही माती,
अनंत मरणे झेलून घ्यावी,
इथल्या जगण्यासाठी, इथल्या पिंपळ पणावरती,
अवघे विश्व तरावे.
शतदा प्रेम करावे चंचल वारा,
या जल धारा,
भिजली काळी माती,
हिरवे हिरवे प्राण तशी ही,
रुजून आली पाती,
फुले लाजरी बघून कुणाचे,
या जन्मावर, या जगण्यावर,
हळवे ओठ स्मरावे.
रंगाचा उघडूनिया पंखा,
सांज कुणी ही केली काळोखाच्या दारा वरती,
नक्षत्रांच्या वेली,
सहा ऋतूंचे सहा सोहळे,
येथे भान हरावे.
बाळाच्या चिमण्या ओठांतून,
हाक बोबडी येते,
वेली वरती प्रेम प्रियेचे,
जन्म फुलांनी घेते,
नदीच्या काठी,
साजणा साठी,
गाणे गात झुरवे.
ह्या ओठांनी चुंबन घेईन,
हजारदा ही माती,
अनंत मरणे झेलून घ्यावी,
इथल्या जगण्यासाठी, इथल्या पिंपळ पणावरती,
अवघे विश्व तरावे.
या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे .|Ya Janmavar Ya Jaganyavar Lyrics | Arun Date\
आपको ये पोस्ट पसंद आ सकती हैं
- करे मंगलवार का व्रत हम स्वीकार करो ना लिरिक्स Kare Mangalwar Ka Vrat Lyrics
- सांसो का क्या भरोसा रुक जाए चलते चलते लिरिक्स Sanso Ka Kya Bharosa Lyrics
- म्हारो बेड़ो पार लगा दिज्यो पितर जी महाराज लिरिक्स Mharo Bedo Paar Laga Dijo Lyrics
- नेकी के रास्ते पे भगवन हमें चलाना लिरिक्स Neki Ke Raste Pe Bhagwan Lyrics
- सानू दुनिया ने दिता ठुकरा लिरिक्स Sanu Duniyan Ne Dita Thukra Lyrics
- मेरा अवगुण भरा रे शरीर हरी जी कैसे तारोगे लिरिक्स Mera Avgun Bhara Sharir Lyrics