जय जय सद्गुरु गजानन रक्षक तूची भक्तजनां लिरिक्स Jay Jay Sadguru Gajaanan Lyrics

जय जय सद्गुरु गजानन रक्षक तूची भक्तजनां लिरिक्स Jay Jay Sadguru Gajaanan Lyrics


Latest Bhajan Lyrics

जय जय सद्गुरु गजानन, रक्षक तूची भक्तजनां,
निर्गुण तू परमात्मा तू, सगुण रुपात गजानन तूं,
सदेह तू परि विदेह तू, देह असूनि देहातील तूं,
माघ वद्य सप्तमी दिनी, शेगावात प्रगटोनी,
उष्ट्या पञावळी निमित्त, विदेहत्व तव हो प्रगट,
बंकटलालावरी तुझी, कृपा जाहली ती साँची,
गोसाव्याच्या नवसासाठी, गांजा घेसी लावुनी ओठी,
तव पदतीर्थे वाचविला, जानराव तो भक्तभला,
जानकीराम चिंचवणे, नासवुनी स्वरुपी आणणे,
मुकिन चंदुचे कानवले, खाऊनी कृतार्थ त्या केलें,
विहिरामाजी जलविहिना, केले देवा जलभरना,
मद्य माश्यांचे डंख तुवां, सहन सुखे केले देवा,
त्यांचे काटे योगबले, काढुनि सहजी दाखविलें,
कुश्ती हरिशी खेळोनी, शक्ती दर्शन घडवोनी,
वेद म्हणूनी दाखविला, चकित द्रविड ब्राम्हण झाला,
जळत्या पर्यकावरती, ब्रम्हगिरीला ये प्रचिती,
टाकळीकर हरिदासाचा, अश्र्व शांत केला साचा,
बाळकृष्ण बाळापूरचा, समर्थ भक्तचि जो होता,
रामदासरुपे त्याला, दर्शन देवुनि तोषविला,
सुकलालाची गोमाता, व्दाड बहू होती ताता,
कृपा तुझी होतांच क्षणी, शांत जाहली ती जननी,
घुडे लश्मन शेगांवी, येता व्याधी तूं निरवी,
दांभिकता परि ती त्याची, तू न चालवूनी घे साची,
भास्कर पाटील तव भक्त, उध्दरिलासी तू त्वरीत,
आध्न्या तव शिरसा वंद्य, काकहि मानति तुज वंद्य,
विहिरीमाजी रक्षीयला, देवां तू गणु जवर्याला,
पितांबराकरवी लीला,  वठला आंबा पल्लविला,
सुबुध्दी देशी जोश्याला, माफ करी तो दंडाला,
सवडद येथील गंगाभारती, थुंकुनि वारली रक्तपिती,
पुंडलिकाचे गंडातर,  निष्ठा जाणुनि केले दूर,
ओंकारेश्र्वरी फुटली नौका, तारी नर्मदा शणात एका,
माधवनाथा समवेत, केले भोजन अदृष्य,
लोकमान्य त्या टिळकांना, प्रसाद तूंची पाठविला,
कवर सुताची कांदा भाकर, भक्शीलीस प्रेमाखातर,
नग्न बैसुनी गाडीत, लिला  दाविली विपरीत,
बायजे चिती तव भक्ती, पुंडलिकावर विरक्त प्रिती,
बापुना मनी विठ्ठल भक्ती,  स्वये होशि तू विठ्ठल मूर्ती,
कवठ्याचा त्या वारकर्याला,  मरीपासूनी वाचविला,
 वासुदेव यति तुज भेटे,  प्रेमाची ती खुण पटे,
उध्दट झाला हवालदार, भस्मिभूत झाले घरदार,
देहांताच्या नंतरही, कितीजना अनुभव येई,
पडत्या मजुरा झेलियले, बघती जन आश्चर्य भले,
आंगावरती खांब पडे, स्ञी वांचे आश्चर्य घडे,
गजाननाच्या अदभुत लीला, अनुभव येती आज मितीला,
शरण जाऊनी गजानना, दुःख तयाते करि कथना,
कृपा करी तो भक्तांसी, धावुन येतो वेगासी,
गजाननाची बावन्नी, नित्य असावी ध्यानीमनी,
बावन्न गुरुवारी नेमे, करा पाठ बहूं भक्तीने,
विघ्ने सारी पडती दूर, सर्व सुखांचा येई पुर,
चिंता सार्या दूर करी, संकटातुनी पार करी,
सदाचार रत सदभक्ता, फळ लाभे बघता बघता,
भक्त गण बोले जय बोला, गजाननाची जय बोला,


ऐसे ही अन्य भजनों के लिए आप होम पेज / गायक कलाकार के अनुसार भजनों को ढूंढें.

ऐसे ही अन्य मधुर भजन देखें 

पसंदीदा गायकों के भजन खोजने के लिए यहाँ क्लिक करें।  
 

एक टिप्पणी भेजें