मल्हारी मार्तंडा माझ्या देवा खंडेराया भजन
सोन्याच्या रं जेजुरीत,
तुझा वास देवा,
तुझं नाव उरामंदी,
तुझी आस देवा,
माय बापावानी तुझी,
आम्हावरी माया,
मल्हारी मार्तंडा माझ्या,
देवा खंडेराया,
देवा खंडेराया माझ्या,
देवा खंडेराया,
देवा खंडेराया माझ्या,
देवा खंडेराया।
हरपलं अंधाराचं,
रान सारं तुझ्यामुळं,
उजळलं सुख दारी,
सदानंदा तुझ्यामुळं,
रख रख उन्हामंदी,
राही तुझी छाया,
मल्हारी मार्तंडा माझ्या,
देवा खंडेराया,
देवा खंडेराया माझ्या,
देवा खंडेराया,
देवा खंडेराया माझ्या,
देवा खंडेराया।
उधळीत भंडारा मी,
रोज घेतो तुझं नाव,
काळजाच्या वेशीवर,
वसलेलं तुझं गाव,
तुझ्याविना कोण येई,
दुःख सावराया,
मल्हारी मार्तंडा माझ्या,
देवा खंडेराया,
देवा खंडेराया माझ्या,
देवा खंडेराया,
देवा खंडेराया माझ्या,
देवा खंडेराया। भजन श्रेणी : आध्यात्मिक भजन (Read More : Devotional Bhajan)भजन श्रेणी : विविध भजन/ सोंग हिंदी Bhajan/ Song Lyrics