येता येता का बेथेलहेमा येता का
येता येता का,
बेथेलहेमा येता का,
येता येता का,
बेथेलहेमा येता का,
दुता संग जय जयकार,
गगना भरिता का।
तन्मय झाला का,
आपण आपण उरला का,
ह्या बाळाची ओळख पटुनी,
ईश्वर दिसला का।
ह्रदयी भरला का,
जिकडे तिकडे उरला का,
खिस्तच माझे जिवन अक्षय,
निश्चय झाला का।
या हो गाता का,
हर्षे नर्तन करीता का,
ख्रिस्त जयंती,
रोज ह्यापुढे,
एसे गनिता का।
येता येता का | Old Christmas songs | Jesus songs India