धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज कविता
धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज कविता
कंटकांच्या माथी,
खड़ग एक थडकला,
डोळ्यात आगलोळ,
बाहूत वज्र तळपला,
दृढ प्रतापी शौर्याचा,
घेऊन वसा बरसला।
स्वराज्याची वज्रमुठ अभेद्य,
गडकोट त्यासी झुंजविला,
करुन शर्थ पराक्रमाची,
यवन पुरता तुडविला,
मराठी आन स्वराज्य प्राण,
पितृवचनासी केवळ जागला,
हार ना कधी पाहिली,
न लालसेत वाकला,
निसंदेह सोडले रायगडास,
राजपाठ ही त्यागला,
ऋण भगव्याचे फेडावयास,
देह सहजची अर्पिला।
नजरेत तप्त सळईचा,
घाव घाव झेलला,
जणू अभिषेक रक्ताचा,
न्हाऊ घाली मायभु ला,
अंग अंग सोलताना,
निश्चय ना कधी डळमळला,
धर्मनिष्ठेसाठीच रूधिराचा,
थेंब थेंब सांडीला,
देहात तो तुटला,
पण धर्मात नाही बाटला,
पाहून त्या यमयातना,
भीमा भामा आक्रंदल्या,
सामना करण्या न धजे,
कराल मृत्यूही थबकला,
विष प्राशूनी उरी,
शिवधर्म परी जागवला,
मिठीत छावा निजताना,
काळ ही गहिवरला।
यातनांचा स्वामी,
शापित राजहंस तो,
विखुरला मातीत जसा,
भिनलाय नसानसात तो,
मनामनात वेदनेचे,
अंगार चेतवून जन्मला,
धैर्य मूर्ती तू शंभुराजा,
मानाचा मुजरा तुला,
मानाचा मुजरा तुला,
मानाचा मुजरा तुला।
खड़ग एक थडकला,
डोळ्यात आगलोळ,
बाहूत वज्र तळपला,
दृढ प्रतापी शौर्याचा,
घेऊन वसा बरसला।
स्वराज्याची वज्रमुठ अभेद्य,
गडकोट त्यासी झुंजविला,
करुन शर्थ पराक्रमाची,
यवन पुरता तुडविला,
मराठी आन स्वराज्य प्राण,
पितृवचनासी केवळ जागला,
हार ना कधी पाहिली,
न लालसेत वाकला,
निसंदेह सोडले रायगडास,
राजपाठ ही त्यागला,
ऋण भगव्याचे फेडावयास,
देह सहजची अर्पिला।
नजरेत तप्त सळईचा,
घाव घाव झेलला,
जणू अभिषेक रक्ताचा,
न्हाऊ घाली मायभु ला,
अंग अंग सोलताना,
निश्चय ना कधी डळमळला,
धर्मनिष्ठेसाठीच रूधिराचा,
थेंब थेंब सांडीला,
देहात तो तुटला,
पण धर्मात नाही बाटला,
पाहून त्या यमयातना,
भीमा भामा आक्रंदल्या,
सामना करण्या न धजे,
कराल मृत्यूही थबकला,
विष प्राशूनी उरी,
शिवधर्म परी जागवला,
मिठीत छावा निजताना,
काळ ही गहिवरला।
यातनांचा स्वामी,
शापित राजहंस तो,
विखुरला मातीत जसा,
भिनलाय नसानसात तो,
मनामनात वेदनेचे,
अंगार चेतवून जन्मला,
धैर्य मूर्ती तू शंभुराजा,
मानाचा मुजरा तुला,
मानाचा मुजरा तुला,
मानाचा मुजरा तुला।
धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज।SAMBHAJI MAHARAJ। Balidandiwas । #status । #marathikavita । मन मोगरा
ऐसे ही अन्य भजनों के लिए आप होम पेज / गायक कलाकार के अनुसार भजनों को ढूंढें.
पसंदीदा गायकों के भजन खोजने के लिए यहाँ क्लिक करें।
आपको ये पोस्ट पसंद आ सकती हैं
