देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी भजन
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या,
हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी,
असोनि संसारीं जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ,
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणें । द्वारकेचा राणा पांडवां घरीं,
चहूं वेदीं जाण साहिशास्त्रीं कारण । अठराहीं पुराणें हरीसी गाती,
मंथुनी नवनीता तैसें घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग,
एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां दुर्गमी न घालीं मन,
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे,
आपको ये पोस्ट पसंद आ सकती हैं