गणपति स्त्रोत मराठी भजन
साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका,
भक्तिने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती,
प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत ते,
तीसरे कृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्त्र ते,
पाचवे श्रीलंबोदर सहावे विकट नाव ते,
सातवे विघ्नाराजेंद्र आठवे धुम्रवर्ण ते,
नववे श्रीभालाचंद्र दहावे श्रीविनायक,
अकरावे गणपति बारावे श्रीगजानन,
देवनावे अशीबारा तीनसंध्या म्हणे नर,
विघ्नाभिती नसेत्याला प्रभो ! तू सर्वसिद्धिद,
विद्यार्थ्यालामिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन,
पुत्रर्थ्यालामिळे पुत्र मोक्षर्थ्याला मिळे गति,
जपता गणपतिस्तोत्र सहामासात हे फळ,
एकवर्ष पूर्ण होता मिळे सिद्धि न संशय,
नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे,
श्रीधाराने मराठीत पठान्या अनुवादिले,
ऐसे ही अन्य भजनों के लिए आप होम पेज / गायक कलाकार के अनुसार भजनों को ढूंढें.
ऐसे ही अन्य मधुर भजन देखें
पसंदीदा गायकों के भजन खोजने के लिए यहाँ क्लिक करें।
आपको ये पोस्ट पसंद आ सकती हैं