करुणाष्टके लिरिक्स Karunaashtake Lyrics

करुणाष्टके लिरिक्स Karunaashtake Lyrics, Shree Samarth Ramdas Navami Special (Marathi)

 
करुणाष्टके लिरिक्स Karunaashtake Lyrics, Shree Samarth Ramdas Navami Special (Marathi)

अनुदिनी अनुतापें तापलों रामराया,
परम दिनदयाळा नीरसी मोहमाया,
अचपळ मन माझें नावरे आवरीता,
तुजविण शिण होतो धांव रे धांव आता।

भजनरहित रामा सर्वही जन्म गेला,
स्वजन जनधनाचा व्यर्थ म्यां स्वार्थ केला,
रघुपति मति माझी आपुलीशी करावी,
सकळ त्यजुनि भावें कास तूझी धरावी।

विषयजनित सूखें सौख्य होणार नाहीं,
तुजविण रघुनाथा वोखटें सर्व कांहीं,
रघुकुळ टिळका रे हीत माझें करावें,
दुरित दुरि हरावें सस्वरूपीं भरावें।

तनु-मनु-धनु माझें राघवा रूप तुझें,
तुजविण मज वाटे सर्व संसार ओझें,
प्रचलित न करावी सर्वथा बुद्धि माझी,
अचळ भजनलीला लागली आस तूझी।

चपळपण मनाचें मोडितां मोडवेना,
सकळ स्वजनमाया तोडितां तोडवेना,
घडि घडि विघडे हा निश्चयो अंतरीचा,
म्हणवुनि करूणा हे बोलतो दीनवाचा।

जळत ह्रदय माझें जन्म कोट्यानकोटी,
मजवरि करुणेचा राघवा पूर लोटीं,
तळमळ निववीं रे राम कारुण्यसिंधू,
षड्‌रिपुकुळ माझें तोडि याचा विरोधु।

तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी,
शिणत शिणत पोटीं पाहिली वाट तूझी,
झडकरि झड घालीं धांव पंचानना रे,
तुजविण मज नेते जंबुकी वासना रे।
 
सबळ जनक माझा राम लावण्यपेठी,
म्हणवुनि मज पोटीं लागली आस मोठी,
दिवस गणित बोटीं प्राण ठेवूनि कंठीं,
अवचट मज भेटी हाती घालीन मीठी।

जननि जनक माया लेंकरूं काय जाणे,
पय न लगत मूखीं हाणिता वत्स नेणे,
जळधरकण आशा लागली चातकासी,
हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी।

तुजविण मज तैंसे जाहलें देवराया,
विलग विषमकाळीं तूटली सर्व माया,
सकळजनसखा तूं स्वामि आणीक नाहीं,
वमकवमन जैसें त्यागिलें सर्व कांहीं,

स्वजन जनधनाचा कोण संतोष आहे,
रघुपतिविण आतां चित्त कोठें न राहे,
जिवलग जिव घेती प्रेत सांडूनि जाती,
विषय सकळ नेती मागुता जन्म देती।

सकळ जन भवाचे आखिले वैभवाचे,
जिवलग मग कैंचे चालतें हेंचि साचें,
विलग विषमकाळीं सांडिती सर्व माळीं,
रघुविर सुखदाता सोडवी अंतकाळीं।

सुख सुख म्हणतां हें दु:ख ठाकूनि आलें,
भजन सकळ गेलें चित्त दुश्चीत जाले,
भ्रमित मन वळेना हीत तें आकळेना,
परम कठिण देहीं देहबुद्धि गळेना।

उपरति मज रामीं जाहली पूर्णकामीं,
सकळ भ्रम विरामीं राम विश्रामधामीं,
घडिघडि मन आतां रामरूपीं भरावें,
रघुकुळ टिळका रे आपुलेंसें करावें।

जळचर जळवासी नेणती त्या जळासी,
निशिदिन तुजपासीं चूकलों गूणरासी,
भुमिधर निगमांसी वर्णवेना तयासी,
सकळ भुवनवासी भेट दे रामदासीं।
अनुदिनी अनुतापें तापलों रामराया,
परम दिनदयाळा नीरसी मोहमाया,
अचपळ मन माझें नावरे आवरीता,
तुजविण शिण होतो धांव रे धांव आता।

Samarth Ramdas was a 17th-century Indian saint, poet, and philosopher who is known for his devotion to Lord Rama and his contributions to Marathi literature. He was a social reformer who advocated for the upliftment of the poor, the oppressed, and women. Samarth Ramdas was born in 1608 in Jamb, a small village in Maharashtra, India. His original name was Narayan Suryaji Thosar, and he was a devotee of Lord Ram from an early age. He renounced the worldly life at the age of 12 and became a disciple of the saint Samarth Akkalkot Swami.


Karunashtake With Lyrics | करुणाष्टके | Shree Samarth Ramdas Navami Special | Rajshri Soul

Language : Marathi
Lyrics : Samarth Ramdas Swami
Composer : Traditional
Artist : Ketan Patwardhan

आपको ये पोस्ट पसंद आ सकती हैं
+

एक टिप्पणी भेजें