जगी तारक जन्मा आला
जगी तारक जन्मा आला
जगी तारक जन्मा आला,चला पाहु चला हो त्याला।
नृप वैभव घेऊन नाही की,
अन्य अलौकीक काही,
तो दिनच जन्मा आला,
जगी दिना तारायला।
जरी सर्व तमाला सारी,
तरी नाही प्रखरहर धारी,
तो सौम्यच जन्मा आला,
जगी पाप्यां तारायला।
जरी शब्द देव जो होता,
तो तनुला झाला धरीता,
तरी दैवी रुप न ल्याला,
प्रिती स्तव आमुचा झाला।
हे आकाशातुन खालि,
नवजीवन हो उडी घाली,
घ्या देही साठवुन याला,
जय येशु जय जय बोला।
Jagi tarak janma aala , Christmas song