मित्रा कर मेत्री त्याची लिरिक्स Mitra Kar Metri Tyachi Song Lyrics
जो सत्याविण शब्द न बोले ,
सहजहि कोणासी,
मित्रा कर मेत्री त्याची।
सहनशीलता सरळवृत्तिची,
वागणूक ज्याची,
अपुले टुःख न वदे कुणाला,
चिंता इतराची,
मित्रा कर मेत्री त्याची।
चरित्र निर्मळ राहणी साधी,
निंदि न कवणासी,
दिनचर्या सततची योग्य ती,
हाव नम मानाची,
मित्रा कर मेत्री त्याची।
हीन दीनाची प्रगती करण्या,
कमाल निष्ठेची,
तुकड्यादास म्हणे तू तरशिल,
कीर्ती जरी गासी,
मित्रा कर मेत्री त्याची।
Rashtrasant Tukdoji Maharaj - जो सत्याविण शब्द न बोले सहजहि कोणासी। मित्रा कर मेत्री त्यासी॥
ऐसे ही अन्य भजनों के लिए आप होम पेज / गायक कलाकार के अनुसार भजनों को ढूंढें.
पसंदीदा गायकों के भजन खोजने के लिए यहाँ क्लिक करें।
Rashtrasant Tukdoji Maharaj –Mitra Kar Maitri tyachI
Source: From the collection of Shri. Mohan Gaigol, Rashtrasant Tukdoji Maharaj Gurudev Seva Ashram Bhajan Mandal, Changefal. हे भजन share करण्यामागे फक्त महाराजांच्या ठायी असलेली भावभक्ती हा एकमेव हेतू आहे.

आपको ये पोस्ट पसंद आ सकती हैं