निसटते हळूच जगणे लिरिक्स

निसटते हळूच जगणे Nisatate Haluch Jagane Lyrics


Latest Bhajan Lyrics

निसटते हळूच जगणे,
मुठीतून माझ्या,
होणे रिते असे हे,
छळते हृदयास माझ्या।

सारी हयात मी ही,
फक्त इमान झाले,
सुखदुःखा पुढेही,
झुकती कमान झाले।

देहास छळून झाले,
उरला श्वास फक्त,
जीवना काय देऊ तुला मी,
माझ्यात मीच रिक्त।

कधी ग्रीष्माचा तळ,
कधी वळीव उथळ,
अवघ्या जिवनाचा खेळ,
व्हावा श्रावणाची ओळ।

जमीन कसते काळजातली,
पुन्हा फिरुनी उगवाया,
फुटेल कोंब एक तरी,
मातीत जन्म रूजाया।


MARATHI KAVITA । निसटते हळूच जगणे । मन मोगरा । #viral #trending #marathikavita #status


ऐसे ही अन्य भजनों के लिए आप होम पेज / गायक कलाकार के अनुसार भजनों को ढूंढें.
 

पसंदीदा गायकों के भजन खोजने के लिए यहाँ क्लिक करें।

आपको ये पोस्ट पसंद आ सकती हैं
Next Post Previous Post