जिंकण्याचा मोह नाही हरण्याचे भय नाही


जिंकण्याचा मोह नाही हरण्याचे भय नाही

स्वामी जिंकण्याचा मोह नाही,
हरण्याचे भय नाही,
स्वामी शक्ती ज्याच्या पाठी,
वेदनेच्या सुटती गाठी।

सोबतीला नाही कुनी,
सोबतीला माझे स्वामी।

उन्हा मधे सावली स्वामी,
दुखः मधे सूख हे स्वामी,
कष्टा चे फळ हे स्वामी,
वेदनेचा अंत स्वामी।

क्षनो क्षनी सोबत स्वामी,
खर खोटं दावतात स्वामी,
घाव आपले घेतो मी पाठी,
जखमा माझा भरतात स्वामी।

स्वप्न होत,
स्वप्न माझ भलंमोठं,
संपल होत,
सोबत माझा कोनी न्हवत,
अंधारात,
दिसली मला एक वाट,
पायी चाललो,
पाय पोहची अक्कलकोट।

डोळ्या मध्ये पाणी,
पाय अनवाणी,
श्री स्वामी श्री स्वामी,
नाम माझा ध्यानी,
दुनिया होती शानी,
तुडवल पायानी,
देव माझा सोबत होते,
नेहमी आई वानी।

स्वामी गुरूमाऊली,
ब्रह्मंडाची सावली,
परिस्थिती बदलून,
दुनिया मला दावली,
साथ तुमची भावली,
वाट मला घावली,
सर्वकाही सोडून,
आलो तूमच्या पावली।

अंधारात हरली वाट,
पायी फुफाटे अन काट,
स्वामी नाम घेता ओठी,
सर्व दुर लक्ख प्रकाश।

व्याकूळलेल्या जीवाचा,
प्राण समर्थ,
जीवनाचा अर्थ म्हणजे,
श्री स्वामी समर्थ,
भिऊ नको आहे पाठी,
माझे स्वामी समर्थ,
एक माय अन बाप,
श्री स्वामी समर्थ।

उन्हा मधे सावली स्वामी,
दुखः मधे सूख हे स्वामी,
कष्टा चे फळ हे स्वामी,
वेदनेचा अंत स्वामी।


Swami (स्वामी) Official Music Video | Prashant Gawali | Avadhoot Gandhi | Brahmaa | Shambo | Poonam

ऐसे ही अन्य भजनों के लिए आप होम पेज / गायक कलाकार के अनुसार भजनों को ढूंढें.
 

पसंदीदा गायकों के भजन खोजने के लिए यहाँ क्लिक करें।

You may also like
Saroj Jangir Author Author - Saroj Jangir

इस ब्लॉग पर आप पायेंगे मधुर और सुन्दर भजनों का संग्रह । इस ब्लॉग का उद्देश्य आपको सुन्दर भजनों के बोल उपलब्ध करवाना है। आप इस ब्लॉग पर अपने पसंद के गायक और भजन केटेगरी के भजन खोज सकते हैं....अधिक पढ़ें

Next Post Previous Post